Lalbaugcha Raja 2019: लालबागचा राजाच्या दरबारात अवतरले अंतराळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 12:16 IST2019-08-30T19:54:47+5:302019-08-31T12:16:04+5:30

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या 'लालबागचा राजा'चा प्रथम मुखदर्शन सोहळा आज संपन्न झाला.

भारताने चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-2 च्या पार्श्वभूमीवर लालबागच्या आराशीसाठी खास अंतराळाचा देखावा तयार करण्यात आला आहे.

लालबागच्या राजाच्या यावर्षीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पा सिंहासनारुढ असला तरी मूर्तीच्या मागील प्रभावळ दाखवण्यात आलेली नाही.

अंतराळात फिरणारे विविध ग्रह, तारे; पृथ्वीभोवती सोडण्यात आलेले कृत्रिम उपग्रह, अंतराळ यान, तबकडी आणि अंतराळवीर यामुळे जणू अंतराळाची सफर केल्याचा भास होतो.

लालबागच्या राजाची मूर्ती