Join us  

Kisan Long March : शेतक-यांसाठी पनवेलहून १ लाख भाक-या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 4:20 PM

1 / 5
नाशिकहून पायपीट करत मुंबईत पोहोचलेल्या हजारो शेतक-यांसाठी पनवेलकरांनी एक लाख भाक-या आणि 500 किलोचं सुकट पाठवलं होतं.
2 / 5
पनवेलमधील गावांगावांतून भाक-यागोळा करून मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत.
3 / 5
5 दिवस पायपीट करत 166 किमीहून अधिक अंतर कापत मुंबईत दाखल झालेल्या या शेतकरी मोर्चेक-यांच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पनवेलकर पुढे सरसावले.
4 / 5
शेतकरी कामगार पक्षानं (शेकाप) शेतक-यांच्या या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी स्थानिक सरपंचांना सांगून भाक-या बनवून घेतल्या आहेत.
5 / 5
प्रत्येक सरपंचाला भाक-यांचं टार्गेट देण्यात आलं होतं. त्यानुसार 1 लाख भाक-या बनवण्यात आल्या आहेत.
टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चMaharashtraमहाराष्ट्र