1 / 5मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. दरम्यान, आज या बाळाचा नामकरणविधी संपन्न झाला. राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठाकरे असं ठेवण्यात आलं आहे. 2 / 5दरम्यान, राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो समोर आले असून, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय नुतन बालकाचं कौतुक करताना दिसत आहेत. हा नामकरण सोहळा अगदी साधेपणाने शिवतीर्थावर संपन्न झाला. 3 / 5नामकरण सोहळ्यावेळी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी काढलेल्या या खास फोटोमध्ये त्यांच्या मागे प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेंचे चित्र दिसत आहे. 4 / 5तर अन्य एका फोटोमध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी आपल्या नातवासोबत दिसत आहेत.5 / 5राज ठाकरेंनी नातवाला ठेवलेल्या नावची सध्या चर्चा सुरू आहे. तसेच त्याचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता दिसत आहे. 'किआन' या नावाचा अर्थ देवाची कृपा प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. किआन हे मूळ संस्कृत नाव असून याचा अर्थ देवाचा आशीर्वाद असा होतो. किआन हे भगवान विष्णूचे दुसरे नाव आहे.