महिना ८९ हजार कमावणाऱ्यांना मुंबईत घर घ्यायला लागणार १०९ वर्षे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:48 IST
1 / 7महाराष्ट्राच्या शहरी भागात राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबांना मुंबई घर घेण्यासाठी १०९ वर्षांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच मुंबईत घर खरेदी करण्यासाठी, सध्याच्या घडीला महिना ८९ हजारांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांना ५ टक्के श्रीमंतांना १०९ वर्षे पैसे वाचवावे लागतील.2 / 7तर हरियाणा आणि ओडिशा या राज्यांतील ५ टक्के श्रीमंतांना त्यांच्या मोठ्या शहरांत घरे घेण्यासाठी ५० वर्षे लागतील. चंदीगड हे शहर सर्वाधिक किफायतशीर शहर ठरले आहे.3 / 7टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वेगवेगळ्या राज्यांची आणि राज्यातील सर्वात मोठ्या शहरात घर खरेदी करण्यासाठी किती बचत आवश्यक आहे याची तुलना करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुंबई, गुडगाव, बेंगळुरू, दिल्ली आणि चंदीगड यांचा समावेश होता.4 / 7विश्लेषणानुसार, सरासरी वार्षिक उत्पन्न १०.७ लाख असलेल्या ५ टक्के कमाई करणाऱ्यांना भारताच्या आर्थिक राजधानीत ११० चौरस मीटरचे (१,१८४ चौरस फूट) घर खरेदी करण्यासाठी १०९ वर्षे बचत करावी लागेल.5 / 7मार्च २०२५ पर्यंत मुंबईसाठी सरासरी प्रति चौरस फूट दर ₹ २९,९११ होता, तर १,१८४ चौरस फूट घराची किंमत सुमारे ₹ ३.५४ कोटी होती. राज्यातील ५ टक्के श्रीमंत कुटुंब दरवर्षी अंदाजे ३.२ लाख बचत करत असल्यास त्यांना मुंबईत घर खरेदीसाठी १०९ वर्षे वाट पाहावी लागेल.6 / 7मुंबई आणि दिल्लीसह भारतातील प्रमुख सात शहरांमध्ये सरासरी मालमत्तेच्या किमतींमध्ये २३% वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत, सरासरी घरांची किंमत ₹ १.२३ कोटींवर पोहोचली होती.7 / 7गुडगावमध्ये समान उत्पन्न गटासाठी घर घेण्यासाठी ६४ वर्षांचा बचतीचा वेळ लागू शकतो. बंगळुरू आणि दिल्लीची स्थिती थोडीशी चांगली आहे, त्यांना अनुक्रमे ३६ आणि ३५ वर्षांची बचत आवश्यक आहे. चंदीगड हे राज्यांच्या राजधानींमध्ये सर्वात परवडणारे शहर आहे, जिथे उच्च उत्पन्न असलेले कुटुंब १५ वर्षांची बचत केल्यानंतर घर खरेदी करू शकतात.