Independence Day : सीएसएमटी इमारतीला तिरंग्याची रोषणाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 21:12 IST2018-08-14T21:06:00+5:302018-08-14T21:12:03+5:30

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली.

मुंबईच्या वैभवात भर घालणारी ही वास्तू हजारो दिव्यांनी उजळून गेली.

या वास्तूच्या नयनरम्य दृष्याला काही नागरिकांनी डोळ्यात साठवलं तर काहींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे.