रूप सुहाना लगता है... मुंबईच्या पोटातून धावणारी मेट्रो पाहिलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 09:10 IST
1 / 7मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोच्या भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर, मुंबईच्या पोटातून धावणारी मेट्रो कशी असेल, याची झलक आज पाहायला मिळाली. 2 / 7त्यातील पहिली ट्रेन नोव्हेंबर २०२० पर्यंत एमएमआरसीच्या ताफ्यात दाखल होईल. 3 / 7मुंबई मेट्रो-३ च्या एका डब्याचं अनावरण आज प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं. 'मुंबई अॅक्वा लाईन' असं नामकरण करण्यात आलेल्या या प्रोजेक्टमध्ये आठ डब्यांच्या ३१ मेट्रो ट्रेन धावणार आहेत. 4 / 7कुलाबा-वांद्रे-सीप्झ हे ३३.५ किलोमीटर अंतर मेट्रो-३ अंतर्गत जमिनीखालून कापलं जाणार आहे. या मार्गावर २७ स्थानकं असतील.5 / 7कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, इंटरनॅशनल एअरपोर्ट, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ, आरे डेपो असा दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांपर्यतचा प्रवास ही मेट्रो करणार आहे.6 / 7एमएमआरसीएलने हे काम ‘अॅलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड’ या कंपनीला दिले आहे. मेट्रो-३ या संपूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेला ‘अॅक्वा लाइन’ असे संबोधले जाणार आहे. या डब्यांची रंगसंगती, तसेच डब्यांची आंतर-बाह्य संरचना नावाला साजेशी करण्यात येणार आहे.7 / 7केंद्र शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेप्रमाणे मेट्रो-३ मार्गिकेच्या सर्व गाड्यांची निर्मिती अॅलस्टॉम इंडिया यांच्या श्री सिटी, आंध्र प्रदेश येथील कारखान्यात होणार आहे. मेट्रो-३ चे डबे अद्ययावत असतील, तसेच विनाचालक कार्यन्वयनासाठी सक्षम असतील, असे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे