भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:45 IST
1 / 10११ जुलै २००६ याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोट घड़विण्यात आली होती. 2 / 10या बॉम्बस्फोटाची तीव्रता तुम्हाला फोटोतून कळेल, एवढी भयाण, भीषण होती. या पीडितांना न्याय मिळाला असे वाटत असतानाच आता आरोपींनी केलेल्या आव्हानावरील निकाल आला आहे. 3 / 10पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. याच्या जखमा पीडित कुटुंब, जखमींवर आजही कायम आहेत. 4 / 10प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब बनवून ते घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबई लोकलमध्ये ठेवण्यात आले होते. 5 / 10या साखळी स्फोटांमध्ये २०९ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला होता. तर ७१४ जण जखमी झाले होते. 6 / 10'लष्कर-ए-कहर' या दहशतवादी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. 7 / 10चर्चगेट स्टेशनमध्ये दहशतवाद्यांनी लोकलमध्ये बॉम्ब ठेवले होते. 8 / 10इंडियन मुजाहिदीनच्या हस्तकाने २००९ मध्ये कटातील सहभागाची कबुली दिली होती. सुमारे नऊ वर्षे या प्रकरणाचा खटला सुरु होता. 9 / 10कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरविले होते. यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तर सात जणांना जन्मठेप झाली होती. 10 / 10आरोपींनी दाखल केलेल्या आव्हानावर आज कोर्टाने या १२ ही जणांना निर्दोष सोडले आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण सुटणार आहेत.