Join us  

आधीच कोरोना, त्यात पावसाळा; धो-धो पावसाने मुंबईचं काय केलं बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 9:03 PM

1 / 8
मुंबई शहर उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. विशेषत: मुंबई शहरासह उपनगरात पावसाने अजूनही चांगलाच जोर पकडला आहे.
2 / 8
अजूनही मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम आहे.
3 / 8
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अद्याप तरी मुंबईत अतिवृष्टी झाली नसली तरी दुपारपर्यंत लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना काहीसा मनस्ताप झाल्याचे चित्र होते.
4 / 8
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधून मधून जोरदार सरी पडत राहतील. काही ठिकाणी अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5 / 8
पावसाचा वेग कमी असल्याने सखल भाग वगळले तरी फार काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र रस्ते वाहतूकीसह मुंबापुरीचा वेग मंदावला होता.
6 / 8
पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
7 / 8
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचं संकट असताना मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे आणखी हाल झाले आहे.
8 / 8
पावसामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला देखील उधाण आले होते. समुद्रकिनारी उंच लाटा उसळत होत्या.
टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस