1 / 9मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून (3 जुलै) पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने येथील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. (सर्व फोटो दत्ता खेडेकर)2 / 9दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. 3 / 9मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. 4 / 9लहान मुलांनी मात्र पावसाचा आनंद घेतला.5 / 9मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.6 / 9 मुंबईत पाऊस कमी झाला आहे. मात्र पुन्हा तो सक्रीय होईल' अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.7 / 94 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसारच, शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ सुरू केला होता.8 / 9मुंबईतल्या सखल भागात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रामुख्याने माटुंगा येथील गांधी मार्केट आणि दादर येथील हिंदमाता परिसराचा समावेश होता. तर उर्वरित ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी पावसाचा वेग आणि मारा कायम राहिल्याने मुंबईचा वेग नेहमीच्या तुलनेत कमी झाला होता.9 / 9गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाने आपला मुक्काम ठोकण्यास सुरुवात केली. पहाटे पावसाचा जोर वाढू लागला. विशेषत: सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस दुपारचे 12 वाजले तरी धो धो कोसळतच होता. या वेळेत पावसाने शहरासह उपनगरात आपला जोर कायम ठेवल्याने शुक्रवारी सकाळी साडेवाजेपर्यंत मुंबईत 57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.