Join us  

महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 11:45 AM

1 / 8
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
2 / 8
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात. यंदाही मोठ्या प्रमाणात अनुयायी याठिकाणी आले आहेत.
3 / 8
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे की, पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
4 / 8
याचबरोबर, लाखो अनुयायी चैत्यभुमी येथे आले आहेत. शासन आपल्या सर्वांचं आहे. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी करण्याचं आणि समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
5 / 8
या सरकारसाठी सर्वोच्च महत्वाची बाब म्हणजे इंदु मिल स्मारक लवकर पूर्ण करणे आहे. जगाला हेवा वाटेल असे हे स्मारक असेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
6 / 8
याचबरोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं काम भारताच्या निर्मितीचे पहिलं पाऊल ठरलं आहे आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो, कारण जिथे लोकांचे विचार संपतात तिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुरू व्हायचे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
7 / 8
याशिवाय, आज देशाच्या या वाटचालीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मौलाचा वाटा आहे. मला या गोष्टीचा समाधान आहे, ज्या वर्षी इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी झाली होती, त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
8 / 8
दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहे. त्यांची सोय मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMumbaiमुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार