Join us  

शिवाजी पार्कवर जय्यत तयारी, शपथविधीचा ग्रँड सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 5:39 PM

1 / 9
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानात म्हणजेच शिवतीर्थावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत आहे.
2 / 9
शपथविधीच्या या ग्रँड सोहळ्यासाठी प्रशासनासोबतच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जय्यत तयारी केल्याचं दिसून येत आहे.
3 / 9
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. हे सरकार माझं सरकार असेल अन् सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले होतं.
4 / 9
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.
5 / 9
शिवाजी पार्कात तब्बल 70 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. तर एका मोठ्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसाठी खुर्च्या लावण्यात येत आहेत.
6 / 9
ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने ठाकरे कुटुंब या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील असं सांगितलं आहे. राज ठाकरे सहकुटुंब या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.
7 / 9
या शपथविधी सोहळ्याला सांगलीतील शेतकरी दाम्पत्यालाही निमंत्रण देण्यात आलंय, ज्यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी पायी विठ्ठलाची वारी केली होती
8 / 9
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. रॅपिड एक्शन फोर्स, बॉम्बशोधक नाशक पथक, श्वान पथक आदिसह 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनातआहे.
9 / 9
शपथविधी सोहळ्याची सकाळपासूनच जय्यत तयारी सुरू असून शिवतीर्थावर ग्रँड सोहळा सायंकाळी पाहायला मिळेल, देशातील दिग्गज नेते या सोहळ्याला हजेरी लावतील.
टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस