By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:44 IST
1 / 5भारतीय सराफा बाजारात सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तांनी सोने-चांदीच्या दरात थोडी वाढ झाली होती. सणाच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. यानंतर मात्र आता सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 2 / 5आज (सोमवार) म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या दरात 746 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता सोन्याचा दर 47379 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीच्या दरात 734 रुपयांनी घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 63186 रुपये प्रति किलो आहे. 3 / 5 दसऱ्याच्या दिवशीही सोने-चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळाला होता. विजयादशमीच्या एक दिवस अगोदर सोन्याची किंमत 472 रुपये आणि चांदीच्या दरात 557 रुपये वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आता पुन्हा सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5 लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.