ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 15:46 IST2018-09-08T15:35:11+5:302018-09-08T15:46:41+5:30

मुंबापुरीत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात ‘श्री’चे आगमन होत आहे.

मुंबईतील नामांकित गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळी चिंतामणीचा आगमन सोहळ्यास दणक्यात सुरूवात झाली आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनासाठी पुण्यातील कलेश्वरनाथ ढोल पथकाची सलामी.

करी रोड येथील खातूंच्या कार्यशाळेतून निघालेल्या चिंतामणीचे फोटो काढण्यासाठी हजारो तरुण व तरुणी एकवटले आहेत.

बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनीही रस्ताच्या दुर्तफा गर्दी केली आहे.

अंधेरी पश्चिम येथील विश्वाचा महाराजा आधार गणेश मित्र मंडळाच्या बाप्पाचे आगमन.

खेतवाडीचा राजा, खेतवाडी दुसरी क्रॉसलेनच्या बाप्पाचे आगमन.

लालबाग-परळचा परिसर बाप्पाच्या मिरवणुकांमुळे गजबजून गेला आहे.