पाण्याखाली विसावले गणपती बाप्पा; पाहा विसर्जनाची मनमोहक दृश्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 10:32 PM2020-09-01T22:32:39+5:302020-09-01T22:42:03+5:30

मुंबईसह राज्यभरात आज गणेश मूर्तींचे साश्रृनयनांनी विसर्जन करण्यात आले. यावेळची ही काही मनमोहक दृष्ये...

मुंबईसह राज्यभरात आज गणेश मूर्तींचे साश्रृनयनांनी विसर्जन करण्यात आले. (फोटो-सुशील कदम /लोकमत)

दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत पाय ठेवायलाही जागा नसते अशा गिरगाव चौपाटीवर एकटाच गणेशभक्त समुद्राकडे जात होता.

गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी या पोलिसांवर मोठा ताण असतो. यावेळी तो काहीसा निवांत होता.