गणेशोत्सव : मुंबईत दीड दिवसांच्या गणपतींचे नियमांच्या चौकटीत राहून विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 10:46 PM2020-08-23T22:46:45+5:302020-08-23T23:49:44+5:30

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरापासुन जवळ असावे म्हणून मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे सोसायटीच्या दारात वाहन आरोहीत विसर्जन हौद उभा केला होता. ( छाया -सुशील कदम)

दीड दिवसाचे गणपतीचे आज मुंबईतील दादर येथील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

दीड दिवसाच्या गणपतींचे आज दादर येथील कृत्रिम तलावात पावसाच्या वर्षावात निमयांच्या चौकटीत राहून विसर्जन करण्यात आले.

गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष फिरत्या कृत्रिम हौदांची निर्मिती करण्यात आली होती.

विसर्जनासाठी मोजक्याच व्यक्तींना प्रवेश दिला जात होता.

गणेशोत्सवानिमित्त कोरोनाबाबत जनजागृती करणारे विशेष देखावे करण्यात आले आहेत.

गणेश विसर्जनासाठी दरवर्षी गर्दीने फुलणारी चौपाटी यावेळी सुनीसुनी होती.

यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे मंडपात शुकशुकाट होता .

कोरोनाच्यादादर पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांना ४ फुटापर्यंत मूर्ती ची परवानगी असल्यामुळे लालबाग येथील मुंबईचा राजा नावाने प्रसिद्ध असलेल्या मंडपात या वर्षी ४ फुटाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

कोरोनाच्या महामारी चे संकट अजून टळले नसल्यामुळे गणपती उत्सवात परदेशात अडकलेल्या आपल्या भावाच्या कुटंबाला ऑन लाईन द्वारे गणपतीच्या आरतीचे दर्शन देतांना मुंबईतील एक कुटुंब.