मोरयाचे हे रूप आगळे! २४० मूर्तींमधून दाखवल्या बालगणेशाच्या लीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 23:02 IST2018-09-05T22:55:44+5:302018-09-05T23:02:57+5:30

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रीगणेशाच्या मूर्ती विविध रुपात साकारण्यात येत आहेत. ( सर्व छायाचित्रे : दत्ता खेडेकर)

लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावर मूर्तीकार विशाल शिंदे यांनी २४० बालगणेशाच्या मूर्ती साकारल्या आहेत.

मूर्तीकार विशाल शिंदे यांनी साकारलेली बालगणेशाची आकर्षक मूर्ती.

गाईच्या वासरासोबत खेळण्यात मग्न झालेला बालगणेश.

शिवशंकराचे वाहन असलेल्या नंदीसोबत बालगणेश.

मोदकांचा आस्वाद घेताना बाप्पा.

बालगोपाळांच्या लीला या मूर्तींद्वारे चित्रित करण्यात आल्या आहेत. बालगणेशाच्या मूर्ती आकर्षक असून, लहानांसोबत मोठयांचेही याकडे लक्ष वेधले जात आहे.