Ganesh Visarjan: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी गणरायाला दिला भक्तिमय वातावरणात निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 21:45 IST
1 / 8 मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानच्या गणरायाचे या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते. 2 / 8अनंत चतुर्दशी दिवशी गणरायाला निरोप देताना राज्यास सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदावे, यासाठी गणरायाकडे प्रार्थना करताना मुख्यमंत्री 3 / 8बाप्पांना निरोप देण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी भक्तिभावाने आरती करण्यात आली. 4 / 8बाप्पांना शिदोरी देऊन आशीर्वाद घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे 5 / 8आदित्य ठाकरे बाप्पांची मंगलमूर्ती विसर्जनस्थळी नेताना 6 / 8बाप्पांचे विसर्जन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा बाप्पांची आरती केली 7 / 8बाप्पांचे विसर्जन करताना आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. 8 / 8पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पांना निरोप दिला.