Join us  

आराम करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज-छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 2:10 PM

1 / 4
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना गुरुवारी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
2 / 4
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून भुजबळ तुरुंगवासात होते. 4 मे रोजी जामिनावर सुटका झाल्यानंतरही छगन भुजबळ रुग्णालयातच होते.
3 / 4
प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणात 'लगेच अॅक्टिव्ह' न होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचं आज भुजबळ यांनी स्मितहास्य करत सांगितलं.
4 / 4
स्वादुपिंडाच्या आजारामुळे केईएम रुग्णालयात आजार घेत असलेले छगन भुजबळ यांना गुरुवारी (10 मे) डिस्चार्ज देण्यात आला, दरम्यान, शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलेलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असतातच, असं म्हणत छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना