Who Is Ananya Pandey: कोण आहे अनन्या पांडे?; बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीचा रंजक आहे 'ती'चा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:45 PM2021-10-21T15:45:08+5:302021-10-21T15:59:14+5:30

Who Is Ananya Pandey: मुंबई ड्रग्ज क्रूझ (Mumbai Drugs Case) प्रकरणात एनसीबीनं आपला तपास आता आणखी वेगानं सुरू केला आहे. यात अनन्या पांडेचीही आता चौकशी केली जाणार आहे. अनन्या पांडेचं नाव का समोर आलंय आणि तिचा इतिहास काय सांगतो ते जाणून घेऊयात...

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) चौकशी दरम्यान एका उद्योन्मुख अभिनेत्रीचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री अनन्या पांडेचं घर गाठलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेला चौकशीसाठीचे समन्स धाडले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी अनन्याचा फोन आणि लॅपटॉप जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय दुपारी दोन वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात बोलावलं आहे. आर्यन खान याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीशी संबंध असल्याचा दावा एनसीबीकडून केला जात आहे.

ड्रग्ज रॅकेटच्या संशयातूनच एनसीबीचे अधिकारी प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आर्यनच्या फोनमधील चॅट्समध्ये अनन्या पांडेचंही नाव पुढे आलं आहे. अनन्याचं नाव या प्रकरणात आल्यामुळे ती नेमकी आर्यनच्या संपर्कात कशी आली? ती इतकी वर्ष कुठं होती? याची माहिती जाणून घेऊयात...

अनन्या पांडे बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी आहे. तिनं बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे. ३० ऑक्टोबर १९९८ सालचा तिचा जन्म आहे.

अनन्या पांडेनंही आर्यन खानसारखंच मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून शालेय शिक्षणाला सुरुवात केली. २०१७ सालापर्यंत ती मुंबईतच होती. त्यानंतर तिनं पॅरिसमध्ये आयोजित वॅनिटी फेअर फॅशन इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता.

अनन्याची २०१८ साली स्प्रिंग सेमिस्टरसाठी USC Annenberg School for Communication and Journalism मध्ये कम्युनिकेशन मेजरसाठी निवड झाली होती. पण त्यावेळी अनन्या आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणा व्यग्र होती. त्यामुळे चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देखील बदलण्यात आली होती.

२०१८ आणि २०१९ साली अॅडमिशन पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यासाठी परवानगी देखील मिळाल्याची माहिती समोर आली होती. पण अनन्या पांडेनं अभिनयाला महत्त्व देत विद्यापीठात न जाण्याचा निर्णय घेतला होता.

अनन्या पांडे हिनं २०१९ साली 'स्टूडंट ऑफ द इयर-२' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. अभिनेता टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्यासोबत ती चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटासाठी अनन्या पांडे हिला बॉलीवूड पदार्पणासाठीची सर्वोत्तम अभिनेत्रीचाही पुरस्कार मिळाला होता.

अनन्या पांडे ही अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिची चांगली मैत्रिण आहे. तर आर्यन खानसोबतही तिची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित काही पुरावे सापडल्यानं एनसीबीनं अनन्या पांडे हिला चौकशीसाठी समन्स धाडल्याचं सांगितलं जात आहे. अनन्या सोबतच आता सुहाना खानच्याही अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read in English