Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:13 IST
1 / 7मालाडमध्ये २००४ मध्ये झालेलं एक एन्काऊंटर पोलीस अधिकारी दया नायक यांचे शेवटचे एन्काऊंटर होतं. २००४ ते ३१ जुलै २०२५ म्हणजे सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांची बंदूक शांत राहिली. ही बंदूक ते कायम सोबत ठेवत आणि कार्यालयात डेस्कवर!2 / 7दया नायक पोलीस दलात अधिकारी म्हणून रुजू झाले, पण सेवेतून निवृत्त होताना त्यांची ओळख एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक अशी बनली. ९० च्या दशकात मुंबईत दया नायक यांच्या हातून पहिलं एन्काऊंटर झालं, तेही थर्टी फर्स्टच्या रात्री.3 / 7३१ डिसेंबर १९९६ ची रात्र होती. लोक १९९७ या वर्षाचे स्वागतासाठी आतूर होते. मुंबईत सगळीकडे जल्लोष सुरू होता. दया नायक त्यावेळी प्रतिष्ठित भागात असलेल्या जुहू पोलीस ठाण्यात कार्यरत होते.4 / 7३१ डिसेंबर १९९६ च्या रात्री दया नायक यांना खबऱ्याने माहिती दिली. छोटा राजन गँगचे दोन शूटर मुंबईत येत आहेत. त्यामुळे पोलीस सतर्क झाले.5 / 7या पहिल्या एन्काऊंटरबद्दल दया नायक यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांना अटक करण्यासाठी तिथे गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी माझ्यावरच गोळीबार सुरू केला. मी माझ्या संरक्षणार्थ गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघे मारले गेले.6 / 7'मी पोलीस दलात नवीन होतो. दोन गँगस्टरचा एन्काऊंटर केल्यामुळे चिंतेत होतो. कारण ते मोठे गुंड होते. पण, पोलीस दलाने माझ्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर माझी बदली विशेष पथकात करण्यात आली, जे गँगस्टरविरोधात करावी करत होते', असे दया नायक यांनी मुलाखतीत म्हटले.7 / 7दया नायक यांनी ८० पेक्षा जास्त गुंडांचे एन्काऊंटर केले. १९९५ मध्ये पोलीस दलात ते रुजू झाले आणि ३० वर्ष सेवा केली. दया नायक दादरमध्ये झालेल्या एका चकमकीत जखमी झाले होते. त्यावेळी ते १७ दिवस रुग्णालयात होते. २००४ मध्ये त्यांनी शेवटच एन्काऊंटर केलं.