Join us  

CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:25 PM

1 / 16
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. तसेच योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
2 / 16
भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 2400 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 78,000 हून अधिक झाली आहे.
3 / 16
कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत.
4 / 16
देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी एका चिमुकल्याने मदतीचा हात दिला आहे.
5 / 16
कोरोनाच्या या लढ्यात मुंबईतील एका 3 वर्षांच्या चिमुकल्याने कपकेक विकून जमा केलेले पैसे हे मुंबई पोलीस दिले आहेत.
6 / 16
कबीर असं या चिमुकल्याचं नाव असून आपल्या कमाईचे पैसे पोलिसांना दिल्यामुळे त्याने सर्वांचंच मन जिंकलं आहे. कबीरने 50 हजार रुपयांचा चेक दिला आहे.
7 / 16
मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक सुंदर व्हिडीओ पोस्ट करून कबीरचं कौतुक करत याबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडियावरही कबीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
8 / 16
आपल्या आईच्या मदतीने कबीरने घरीच कपकेक तयार केले आणि ते विकून पैसे कमावले.
9 / 16
कबीर आपल्या आई-बाबांसह पोलिस मुख्यालयात पोहोचला आणि त्याने एकूण 50 हजारांचा चेक हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
10 / 16
'3 वर्षांच्या या बेकरकडे मुंबई पोलिसांसाठी मोठं सरप्राईज होतं. कबीरने त्याच्या कमाईतून मुंबई पोलीस फाऊंडेशनसाठी एक मोठं योगदान दिलं आहे' असं पोलिसांनी म्हटलं आहे.
11 / 16
कबीरला 10 हजार रुपये कमवायचे होते. मात्र कपकेक विकून त्याने कमवायचे होते त्यापेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.
12 / 16
कबीरला 10 हजार रुपये कमवायचे होते. मात्र कपकेक विकून त्याने कमवायचे होते त्यापेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.
13 / 16
कबीरला 10 हजार रुपये कमवायचे होते. मात्र कपकेक विकून त्याने कमवायचे होते त्यापेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.
14 / 16
काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशमधील एका चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले 971 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले होते.
15 / 16
हेमंत असं या चिमुकल्याचं हेमंतने सायकल विकत घेण्यासाठी काही पैसे साठवले होते. मात्र देशात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे त्याने सायकलसाठी साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले.
16 / 16
विजयवाडा येथे मंत्री पेरनी वेंकटरामय्यह यांचं कार्यालय आहे. तिथे जाऊन चार वर्षाच्या हेमंतने आपले सायकलसाठी जमा केलेले 971 रुपये कोरोनाशी लढण्यासाठी दिले. यामुळे चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbai policeमुंबई पोलीसMumbaiमुंबईPoliceपोलिसIndiaभारत