Join us  

Chartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 3:14 PM

1 / 7
घाटकोपर भागातील सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झालेत.
2 / 7
महिला वैमानिकासह तीन तंत्रज्ञ व एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
3 / 7
विमान कोसळल्यानंतर झालेल्या स्फोटामुळे येथे मोठी आग लागली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
4 / 7
घाटकोपर पश्चिमेकडच्या एलबीएस मार्गावरील जीवदया लेन येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कम्पाऊंडमध्येच हे विमान कोसळले.
5 / 7
अपघातग्रस्त विमान उत्तर प्रदेश सरकारचे होते. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या विमानाची 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनकडे विक्री केली होती.
6 / 7
या अपघातात महिला वैमानिकासह इतर तिघांचा मृत्यू झाला असला तरी वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत.
7 / 7
या अपघातात महिला वैमानिकासह इतर तिघांचा मृत्यू झाला असला तरी वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत.
टॅग्स :Mumbai Plane Crashमुंबई विमान दुर्घटनाairplaneविमानAccidentअपघातGhatkoparघाटकोपर