Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वे सज्ज; १ हजार ४८४ विशेष ट्रेन सेवा, अनारक्षित किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:45 IST

1 / 9
Central Railway Special Trains Services 2026: उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवासाचे नियोजन सुलभ व्हावे आणि नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
2 / 9
उन्हाळ्याच्या हंगामात मोठ्या संख्येने लोकं गावी जातात. परिणामी नियमित गाड्यांमध्ये तुडूंब गर्दी होते. ही परिस्थिती लक्षात घेत आधीपासून धावणाऱ्या काही गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत तर, काही नवीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे.
3 / 9
महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणांसाठी दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. याशिवाय राज्याबाहेरील प्रवाशांसाठीही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे उत्तर भारत तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
4 / 9
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने स्थानकांवर अतिरिक्त व्यवस्था करण्याचेही नियोजन केले आहे. यंदा १ हजार ४८४ उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात ७४९ आरक्षित तर ७३५ अनारक्षित रेल्वेचा समावेश आहे.
5 / 9
तिकीट बुकिंग, प्रवासी माहिती, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. या सर्व विशेष गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि आरक्षणासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
6 / 9
सीएसएमटी ते गोरखपूर, एलटीटी ते दानापूर, पुणे ते गोरखपूर आणि दानापूर ते पुणे या मार्गांवरील दैनिक विशेष ट्रेनचा समावेश आहे. या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांना उन्हाळ्यातील प्रवासाचे नियोजन करता येईल आणि गर्दीमुळे निर्माण होणारी अडचण टाळता येईल.
7 / 9
या विशेष ट्रेन महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यानच्या मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. यात मुंबई/दौंड ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर, नाशिक रोड ते बडनेरा आणि हडपसर ते हरंगुळ या मार्गांचा समावेश आहे.
8 / 9
महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांसाठीही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहेत. मुंबई ते बलिया, मुंबई ते गोरखपूर, दौंड ते कलबुर्गी आणि सोलापूर ते कलबुर्गी/अनकापल्ली या मार्गांवर देखील गाड्या धाववल्या जाणार आहेत. या उन्हाळी विशेष ट्रेनमध्ये मागणीनुसार आधीच चालवण्यात येणाऱ्या ट्रेन आणि काही अतिरिक्त सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
9 / 9
मध्य रेल्वेकडून खडकी इंदूर आणि हडपसर प्रयागराज या दोन ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये इंदूर खडकी इंदूर साप्ताहिक विशेष आणि हडपसर -प्रयागराज साप्ताहिक विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे या ट्रेनचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpassengerप्रवासीticketतिकिट