Join us
Daily Top 2Weekly Top 5

Amrit Bharat Express: मुंबईतून सुटणार अन् थेट ईशान्य भारतात पोहोचणार, अमृत भारत एक्स्प्रेसचे शेवटचे स्टेशन कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 21:27 IST

1 / 10
Amrit Bharat Express: परवडणाऱ्या दरात चांगला प्रवास म्हणून भारतीय रेल्वेला पसंती देतात. गेल्या काही वर्षात रेल्वेकडूनही नवनव्या गोष्टी केल्या जात असून, आता अमृत भारत एक्स्प्रेसची संख्या वाढवण्यात आली आहे. नवीन ९ अमृत भारत एक्स्प्रेसची घोषणा करण्यात आली आहे.
2 / 10
कामाख्या रोहतक अमृत भारत एक्स्प्रेस आसाम, पश्चिम बंगाल, बिहार उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा या राज्यांना जोडणार आहे. कामाख्यावरून शुक्रवारी ही एक्स्प्रेस रवाना होईल आणि रविवारी रोहतकला पोहोचेल. त्यानंतर रविवारीच रोहतकवरून निघेल आणि मंगळवारी दुपारी कामाख्याला पोहोचेल.
3 / 10
दिब्रुगड-लखनौ अमृत भारत एक्स्प्रेस आसाम, नागालँड, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून धावणार आहे. काझीरंगा राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय, कामाख्या मंदिर, अयोध्या या महत्त्वाच्या ठिकाणांना ही गाडी जोडणार आहे.
4 / 10
न्यू जलपाईगुडी ते नगरकाईल अमृत भारत एक्स्प्रेस केरळला पूर्वेकडील राज्यांना जोडणार आहे.
5 / 10
न्यू जलपाईगुडी ते तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्स्प्रेस केरळ आमि तामिळनाडू या राज्यांच्या दरम्यान धावणार आहे.
6 / 10
अलिपुरदूअर एएमव्हीटी बंगळुरू अमृत भारत एक्स्प्रेस पूर्वेकडील राज्ये आयटी हब असलेल्या शहराला जोडली जाणार आहेत.
7 / 10
अलिपूरदुअर पनवेल अमृत भारत एक्स्प्रेस पूर्वेकडील राज्यांत जाण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईतून नाहीतर नवी मुंबईला लागून असलेल्या पनवेलवरून सुटणार आहे. सोमवारी पनवेलवरून निघणारी ही अमृत भारत एक्स्प्रेस बुधवारी अदिपूरदूअरला पोहोचणार आहे. ही गाडी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातून धावणार आहे.
8 / 10
संत्रागाची (कोलकाता) ते तांबरम अमृत भारत एक्स्प्रेस कोलकाता विभागाला चेन्नईशी जोडणार आहे. या गाडीमुळे दोन्ही राज्यातील शिक्षण, आरोग्य आणि सेवा क्षेत्राला चालना मिळणार आहे.
9 / 10
हावडा ते आनंद विहार अमृत भारत एक्स्प्रेसमुळे पश्चिम बंगाल ते एनसीआर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ही गाडी हावडावरून गुरुवारी सुटणार आणि आनंद विहार येथे शनिवारी पोहोचेल.
10 / 10
सेलडाह ते बनारस अमृत भारत एक्स्प्रेसमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. ही अमृत भारत एक्स्प्रेस दररोज धावणार आहे.
टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेwest bengalपश्चिम बंगाल