आकाश अंबानीच्या लग्नपत्रिकेचं व्हायरल सत्य...पत्रिका खरी की खोटी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 17:39 IST
1 / 4गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी यांच्या कथित लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चांगलीच चर्चेत आहे. 2 / 4या एका पत्रिकेची किंमत दीड लाख रुपये असून अशा 50 पत्रिका छापण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. फोटोत सोन्याचा मुलामा दिलेली, मोत्यांनी मढलेली पत्रिका व्हायरल चांगलीच झाली होती.3 / 4मात्र ही माहिती खोटी असून यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. 4 / 4आकाश अंबानी यांच्या विवाहाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून, कोणतीही पत्रिका छापलेली नाही, असं 'रिलायन्स'ने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे व्हायरल झालेली पत्रिका मुकेश अंबानींची नसून फक्त अफवा असल्याचं समोर आलं आहे.