Join us  

'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 8:46 AM

1 / 10
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये, मुंबईतील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे.
2 / 10
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात १९७४ साली नरिमन पॉईंट येथे समुद्र किनारी मोक्याच्या ठिकाणी ही इमारत बांधण्यात आली. १०,८०० स्केअर फूट क्षेत्रफळ असलेली ही २३ मजल्याची टोलेजंग इमारत मुंबईकरांचे खास आकर्षण आहे.
3 / 10
एअर इंडिया कंपनी टाटा समूहाला विक्री केल्यानंतर मुंबईतील एअर इंडियाची इमारत केंद्र सरकारच्या ताब्यात आली. त्यानंतर, केंद्राने ही इमारत राज्य सरकारला विकण्यास मान्यता दिली. सुरूवातीला या इमारतीसाठी १४५० कोटींची बोली लावण्यात आली होती.
4 / 10
एअर इंडिया असेट्स होल्डिंग लिमिटेड कंपनीने हा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून १६०० कोटींची बोली लावण्यात आली. ही बोली अंतिम ठरली.
5 / 10
एअर इंडियाने २०१८ मध्ये ही २३ मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात याचा शासन निर्णय झाला.
6 / 10
मरीन ड्राईव्ह शेजारील ही इमारत म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीचा उत्तम नमुना होती. कारण, आज आपणे मेट्रो स्टेशन, मॉल, रेल्वे स्टेशनवर सरकते जीने पाहतो, तो सरकता जिना देशात सर्वप्रथम या इमारतीत बसविण्यात आला होता.
7 / 10
ग्राऊंड फ्लोअर ते फर्स्ट फ्लोअर असा हा एक्सलेटर होता, जिथे एअर इंडियाचे बुकींग ऑफिस होते. त्यावेळी, अनेकजण केवल एक्सलेटरची राईड घेण्यासाठी या इमारतीत येत.
8 / 10
जेआरडी टाटा यांनी एअर इंडियाचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच स्वप्नाचा भाग असलेली ही एअर इंडिया इमारत आहे. त्यामुळे, या इमारतीचं इतिहासातील मानाचं स्थान अढळ असणार आहे.
9 / 10
बिझनेस स्टँडर्डमधील एका वृत्ताच्या आधारे एअर इंडियाच्या ह्या इमारतीचे डिझाईन अमेरिकेचे आर्कीटेक्ट जॉन बरगी यांनी बनवलेले होते.
10 / 10
दरम्यान, सन १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटादरम्यान एक बॉम्ब या इमारतीच्या बेसमेंटवर असलेल्या कारमध्ये फुटला होता. मात्र, ही इमारत मजबुतीने उभी राहिली.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाEknath Shindeएकनाथ शिंदेGovernmentसरकारMumbaiमुंबईTataटाटा