मुंबईत महिला गोविंदांचा सराव जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 21:03 IST2018-08-28T20:59:11+5:302018-08-28T21:03:33+5:30

मुंबई : दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. यापार्श्वभूमीवर गोविंदांचा जोरदार सराव सुरु आहे. (फोटो - दत्ता खेडेकर)

विलेपार्ल्यातील ' पार्ले स्पोर्ट क्लब महिला दहीदंडी' मंडळच्या महिलांनी साठे कॉलेजच्या मैदानात सराव केला.

यावेळी या महिला गोविंदांनी पाच थरांची सलामी दिली.

मुंबईमध्ये गेली अनेक वर्षे महिला गोविंदा या सणाचा आनंद घेत आहेत.

याची सुरुवात कुर्ला येथील गोरखनाथ पथकापासून झाली. त्यानंतर पार्ले स्पोर्ट्स क्लबचे पथक दहीहंडीच्या मैदानात उतरले.

टॅग्स :मुंबईMumbai