Join us  

मोदींनंतर फडणवीसांनीही दिला पक्षनिधी, जाणून घ्या रक्कम किती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 5:11 PM

1 / 9
भाजपचे प्रमुख नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाला निधी म्हणून एक हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच, भाजपच्य सर्व कार्यकर्त्यांनाही पक्षासाठी मदतनिधी देण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.
2 / 9
भाजपचे हात बळकट करण्यासाठी आणि भारताला मजबूत बनविण्यासाठी आर्थिक स्वरुपात मदत करण्याचं आवाहनच मोदींनी केलं आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयात हा फंड जमा होणार असून मोदींनी आजच ही रक्कम जमा केली आहे.
3 / 9
नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील भाजप नेते पक्षनिधी म्हणून 1000 रुपये जमा करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षनिधी म्हणून 1000 रुपये देणगी दिली आहे.
4 / 9
फडणवीस यांच्यासह केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनीही पक्षाला 1 हजार रुपयांचा निधी देऊ केला आहे. तसेच, फडणवीस यांनी राज्यातील इतर कार्यकर्त्यांनाही देणगी देण्याचं आवाहन केलं आहे.
5 / 9
दिवंगत भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जंयतीनिमित्त भाजपला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी भाजपच्यावतीने हे अर्थिक मदतीचं अभियान चालविण्यात येत आहे. त्यास, गावपातळीवरुनही प्रतिसाद देण्यात येत आहे.
6 / 9
मोदींनी पीएम केअर फंडाच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून देशाच्या नागरिकांसाठी सोयी-सुविधा देण्याचं काम पंतप्रधान म्हणून केलं. आता, भाजपचे प्रमुख नेते म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
7 / 9
मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, पक्षासाठी 1 हजार रुपये त्यांनी देऊ केले आहेत. तसेच, कार्यकर्त्यांनाही पक्षनिधीसाठी आवाहन केलंय.
8 / 9
नेहमी राष्ट्र प्रथम ठेवण्याचा आपला आदर्श आणि आजीवन नि:स्वार्थ सेवेची आपल्या कार्यकर्त्यांची संस्कृती आहे. तुमच्या लहानशच्या देणगीमुळे हा राष्ट्राभिमान आणि संस्कृती अधिक दृढ होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
9 / 9
देवेेंद्र फडणवीस यांनीही भाजपला अधिक मजबूत बनविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना 1000 रुपयांचा पक्षनिधी देण्याचं आवाहन केलंय.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा