1 / 7मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. राज आणि उद्धव एकत्र येताच कार्यक्रमस्थळी एकच जल्लोष पाहायला मिळाला.2 / 7या मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी काही मराठी कलाकार देखील उपस्थित होते. मात्र चर्चा फक्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचीच होती.3 / 7या मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी काही मराठी कलाकार देखील उपस्थित होते. मात्र चर्चा फक्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचीच होती.4 / 7यावेळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेजवरील उपस्थितिनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. दोन्ही भावांनी मिठी मारत हात उंचावून लोकांना अभिवादन केलं.5 / 7कार्यक्रमाच्या शेवटी अमित ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या तर आदित्य ठाकरे हे राज ठाकरेंच्या शेजारी उभे होते. यावरुनच ठाकरेंची राजकारणातील पुढची पिढी तयार असल्याचे दाखवून देण्यात आले.6 / 7कार्यक्रमाच्या ठिकाणी संपूर्ण ठाकरे कुटुंब पुन्हा एक आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. कार्यक्रम संपत असताना स्टेजवर रश्मी ठाकरे या देखील स्टेजवर आल्या होत्या. या फॅमिली फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.7 / 7हिंदीविरुद्धच्या या आंदोलनात महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनीही साथ दिली होती. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. (सर्व फोटो-दत्ता खेडेकर)