Join us  

पहिल्यांदा पाहताच रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला?; 'अशी' झाली होती दोघांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 10:22 PM

1 / 5
बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर रणवीर व दीपिकाने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
2 / 5
दीपिका पादुकोणने सांगितले होते की, बॅन्ड बाजा बारात या चित्रपटाचा प्रोमो बघितल्यानंतर तिच्या प्रतिनिधीने रणवीर सिंगची खूप प्रशंसा केली होती. तसेच रणवीर एक दिवस मोठा अभिनेता होईल असं देखील सांगितलं होतं असं दीपिकाने सांगितले.
3 / 5
पहिल्यांदा जेव्हा दीपिका रणवीरला भेटली तेव्हा तिला वाटले की रणवीर आपल्या टाइपनूसार नाही आहे. परंतु बॅन्ड बाजा बारात चित्रपट बघितल्यानंतर रणवीरने केलेला अभिनय दीपिकाला खूप आवडला होता.
4 / 5
दीपिका आणि रणवीरची प्रथम एका पुरस्कार सोहळ्यात भेट झाली. त्याच वेळी रणवीरने प्रथमच दीपिका पादुकोणला पाहिले होते. तसेच रणवीरने सांगितले होते की दीपिकाला पहिल्यांदा पाहताच प्रेमात पडला होता. या भेटीनंतर त्यांची अनेक वेळा विविध हॉटेमध्ये भेटी झाल्या.
5 / 5
रणवीर आणि दीपिकाने रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी सारख्या प्रसिद्ध चित्रपटात एकत्र भूमिका साकारली होती. तसेच रामलीला चित्रपटानंतर दोघं एकमेकांना जास्त वेळ देऊ लागले असं सांगितले जाते.
टॅग्स :Ranveer Singhरणवीर सिंगDeepika Padukoneदीपिका पादुकोण