मराठी भाषा दिनानिमित्त परळमध्ये ५०x३० फुटांची भव्य रांगोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 16:01 IST
1 / 7ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस आणि मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून परळमध्ये ५०x ३० फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. 2 / 7रंगरेषा या रांगोळी ग्रुपने ही ५०x ३० फुटांची रांगोळी साकारली आहे. 3 / 7परळच्या आर. एम. भट्ट हायस्कूलमध्ये ही रांगोळी काढण्यात आली आहे. 4 / 7यासाठी तब्बल २०० किलो रंग रांगोळी वापरण्यात आली. 5 / 7रांगोळी पूर्ण करण्यासाठी कलाकारांना जवळपास २३ तास लागले. 6 / 7रांगोळीमधील कविता विपुल शिवलकर याने लिहिली आहे.7 / 7ही रांगोळी १मार्चपर्यंत सर्वंना पाहता येणार आहे.