By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:09 IST
1 / 12RailOne App Issue News: रेल्वे प्रशासनाने डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोठे पाऊल टाकत, आता सर्व रेल्वे सेवा एकाच ॲपवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने विकसित केलेले 'RailOne' हे नवीन ॲप्लिकेशन रेल्वेने आणले आहे. लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा लोकल ट्रेनचे तिकीट काढणे असो, सर्व सुविधा या एकाच ॲप्लिकेशन देण्यात आलेल्या आहेत. 2 / 12रेल्वे मंत्रालयाने 'वन नेशन, वन ॲप' ही संकल्पना राबवण्यासाठी 'Rail One' हे अष्टपैलू ॲप विकसित केले आहे. या एकाच ॲपमध्ये प्रवाशांना आरक्षित आणि अनारक्षित तिकीट बुकिंग, लोकल पासचे नूतनीकरण, ट्रेनचे लाईव्ह स्टेटस आणि प्लॅटफॉर्म क्रमांक, पीएनआर स्टेटस आणि रिफंडची सुविधा, प्रवासात जेवण ऑर्डर करण्याची सोय या सुविधा मिळतील.3 / 12डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. कोट्यवधी प्रवाशांनी हे RailOne डाऊनलोड केले आहे. परंतु, याच्या युझर आणि प्रवाशांना एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे काही जणांना हजारो रुपये अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. 4 / 12रेल्वे प्रवाशांना एकाच अॅपवर सर्व सुविधा मिळाव्या, यासाठी रेल्वे प्रशासनाने 'रेलवन अॅप' सुरू केले आहे. 'रेलवन अॅप'मधून तिकीट आरक्षण न झाल्यास रक्कम पुन्हा बँक खात्यात वळती होत नाही. परिणामी, रक्कम 'रेलवन' मध्येच अडकून राहते आहे. 5 / 12अॅपच्या या अजब धोरणांवरून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे एका प्रवाशाचे तिकीट आरक्षित न झाल्याने २० हजार रुपये 'रेलवन'मध्ये अडकल्याची बाब समोर आली आहे.6 / 12आरक्षित, विनाआरक्षित रेल्वे तिकिटांसह फलाट तिकीट, रेल्वेगाडीचा ठावठिकाणा, पीएनआर तपासणी करणे यांसह अन्य वॉलेटमधील पैसे पुन्हा बँक खात्यात वळते होत नसल्याने संताप एआय बाबींसाठी रेलवन अॅप सुरू करण्यात आले आहे. 7 / 12एक कोटीहून अधिक प्रवाशांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम (क्रिस) कडून 'रेलवन'ची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र यातील त्रुटी आता उघड होत आहेत. एका प्रवाशाने 'रेलवन'वरून तिकीट आरक्षित करण्यासाठी अँपमधील वॉलेटमध्ये दहा हजार रुपये जमा केले. मात्र तांत्रिक अडचणींमुळे तिकिटाचे आरक्षण झाले नाही. 8 / 12विशेष म्हणजे कपात झालेली रक्कम ही बँक खात्यात जमा झाली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा वॉलेटमध्ये दहा हजार रुपये जमा करून आरक्षित तिकीट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही अयशस्वी ठरला. 9 / 12परिणामी, प्रवाशाचे २० हजार रुपये 'रेलवन'मधील वॉलेटमध्ये अडकले. अॅपमधून ही रक्कम संबंधित बँक खात्यात वळती करण्याचा पर्यायच नसल्याने ही रक्कम वॉलेटमध्ये अडकली आहे.10 / 12यूटीएस अॅप बंद केल्यानंतर संबंधित रक्कम बँक खात्यात जमा होत होती. मात्र 'रेलवन'च्या वॉलेटमधील रेक्कम बँक खात्यात वळती करण्याबाबत कोणताही पर्याय दिसत नाही. 11 / 12अॅप वॉलेटमधील रक्कम संबंधित बँक खात्यात वळती न करण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण अत्यंत चुकीचे आहे, अशी तक्रार प्रवासी करत आहेत. मुळात आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट उपलब्ध असूनही तिकिटाचे आरक्षण झाले नाही. 12 / 12रेलवन अॅपमध्ये तिकिटाची प्रक्रिया होते, मात्र तिकीट उपलब्ध होत नाही. परिणामी प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वॉलेटमधील रक्कम खात्यात वर्ग करण्याची मुभा द्यावी, असा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे.