विद्यार्थ्यांच्या पोषक आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 06:52 AM2019-07-28T06:52:44+5:302019-07-28T06:53:03+5:30

जंक फूडचा प्रचार आणि प्रसार होणार नाही याची काळजी शाळांनी घ्यायची आहे़ तसेच जिथे मुले घरून डबा आणतात त्या शाळांनी पालकांना विश्वासात घेऊन पोषक आहाराचा समावेश केला पाहिजे.

 The health committee will focus on the nutrition of the students | विद्यार्थ्यांच्या पोषक आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष

विद्यार्थ्यांच्या पोषक आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष

googlenewsNext

- दिव्या करवा

मुंबई/लातूर : प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आरोग्य समिती स्थापन करून उपहारगृहात अथवा घरून आणल्या जाणाऱ्या डब्यात पोषक आहार कसा असावा याबाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमावली तयार केली असून, त्याची जुलै ते डिसेंबर २०१९ पर्यंत अंमलबजावणी होणार आहे़ त्यासाठी शाळा, महाविद्यालयात जागरूकता निर्माण करून जंक फूडला हद्दपार करीत डब्याचा ८० टक्के भाग हरीत पदार्थांचा असावा, अशी सूचना केली आहे़
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ़ पल्लवी दराडे यांनी संपूर्ण वर्षभराचा पोषण आहार कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांना कळविला आहे़ राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना मान्य केल्या आहेत़ त्यानुसार प्रत्येक शाळेत आरोग्य समिती असेल ज्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक असतील़ ज्याद्वारे शाळा, महाविद्यालयातील उपहारगृहामध्ये दिले जाणारे पदार्थ, भोजन आरोग्यदायी होईल याची काळजी घेतली जाईल़ जंक फूडचा प्रचार आणि प्रसार होणार नाही याची काळजी शाळांनी घ्यायची आहे़ तसेच जिथे मुले घरून डबा आणतात त्या शाळांनी पालकांना विश्वासात घेऊन पोषक आहाराचा समावेश केला पाहिजे़ आरोग्य सदृढ रहावे यासाठी हिरव्या पालेभाज्य व कडधान्यावर भर देणे आवश्यक आहे़

पॅकिंग पदार्थामुळे मुले घरचे पदार्थ खात नाहीत़़़
- जंक फूड हे आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीचा भाग होत आहे़ त्याचा मुलांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे़ त्यामुळे घरून आणला जाणारा डबा व कँटिनमधील पदार्थांमध्ये मोठे बदल सुचविण्यात आले आहेत़
- कँटिनच्या भोजनात जंकफूड नाहीसे करण्याचे आदेश दिले आहेत़ पोषक आहार नसल्यामुळे मुले एचएफएसएस अर्थात हाय फॅट शुगर अँड सॉल्ट म्हणजेच ज्यामध्ये मेद, मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त आहे, असे पदार्थ खातात़
- आकर्षक जाहिरातींमुळे कमी किमतीतील पॅकिंगमधील पदार्थांची सवय लागते़ ज्यामुळे घरी बनविलेले पदार्थ मुले खात नाहीत़ त्याचे दुष्परिणाम म्हणून आवश्यक कार्बोदके व प्रथिने मुलांना मिळत नाहीत़
- दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना आपल्या संस्थेत दिल्या जाणाºया अन्न पदार्थांच्या मेनुची माहिती आॅगस्ट ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना द्यावी लागेल़ तसेच सहाय्यक आयुक्त व आरोग्य समन्वयक शाळांना भेट देवून आढावा घेतील़

आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कार्यशाळा
शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, आरोग्य समिती, विद्यार्थी, पालक यांना पोषक आहाराचे महत्व सांगण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन अन्न व प्रशासन विभाग करणार आहे़ त्याचा अहवाल डिसेंबरमध्ये पाठवून शाळा, महाविद्यालयात दिल्या जाणाºया अन्न पदार्थांच्या मेनूमध्ये बदल केला जाणार आहे़


शिक्षण सोडून बाकी सर्व गोष्टी शिक्षक व शाळांकडून करून घेण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. जेणेकरून या व्यवस्थेवरून जनतेचा विश्वास उडेल. मुळात जंकफूड वा इतर अन्न हे सामान्य विद्यार्थी नव्हेतर, ज्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे व मुलांच्या डब्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे पालक आपल्या पाल्यांना देतात. खरेतर, शासनाने पालकांकडे कोणतीही जबाबदारी दिली नाही, तर सर्व जबाबदारी शाळांवर टाकत आहेत. तर मग हे विद्यार्थी तरी पालकांचे का? किती समिती व त्यांच्या सभा, त्यांचे इतिवृत्त यातच शिक्षण व्यवस्था गुदमरतेय.
- प्रशांत रमेश रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

Web Title:  The health committee will focus on the nutrition of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई