Join us  

झोडप ‘धारा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 6:15 PM

सांताक्रूझमधील नाल्यात पडलेली मुलगी बेपत्ताच; शोधकार्य थांबले

 

१२१ ठिकाणी झाडे कोसळली२४ ठिकाणी शॉर्टसर्किट१४ ठिकाणी घराचा भाग पडला

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी देखील पावसाचा जोर कायम राहिला. पावसात सलगता नसल्याने फार कमी ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी अधून-मधून कोसळत असलेल्या कोसळधारांमुळे  मुंबापुरीचा वेग रोजच्या तुलनेत कमी झाला असून, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.मुंबईत पाऊस कोसळत असतानाच सांताक्रूझ येथे नाल्यात घर पडून झालेल्या दुर्घटनेत ३ मुली आणि १ महिला नाल्यात पडली. आतापर्यंत १ महिला व २ मुलींना बाहेर काढण्यात आले. यातील शिवन्या मिलिंद काकडे या ३ वर्षीय मुलीची प्रकृती स्थिर आहे. तर जान्हवी मिलिंद काकडे (दिड वर्ष) आणि रेखा काकडे (२६) याचा मृत्यू झाला. अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकामार्फत चौथ्या मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र रात्री ऊशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. तर बुधवारी सकाळी पाऊस पडत असतानाच पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक गांधी मार्केट आणि सायन रोड नंबर २४ येथून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. ---------------------

शहरात २ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ९ अशा एकूण १४ ठिकाणी घराचा भाग पडला.शहरात ३५, पूर्व उपनगरात २१ आणि पश्चिम उपनगरात ६५ अशी १२१ ठिकाणी झाडे कोसळली.शहरात १५, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण २४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.---------------------

येथे साचले पाणीहिंदमाता, वडाळा येथील शेख मिस्री दर्गा रोड, बीपीटी स्काय वॉक, गांधी मार्केट, सायन रोड नंबर २४, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, दहिसर सबवे, अंधेरी सबवे, अंधेरी मार्केट येथे पाणी साचले होते. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शेख मिस्त्री दर्गा रोड व पोस्टल कॉलनी वगळता इतर सर्व ठिकाणच्या पाण्याचा निचरा झाला होता.------------------------

२४ तासांचा पाऊसशहर ४५.३८ मिमीपूर्व उपनगर ६९.११ मिमीपश्चिम उपनगर ८२.४३ मिमी

४ ऑगस्टपर्यंतचा पाऊस.कुलाबा २ हजार ७२.२ मिमीसांताक्रूझ २ हजार २५३.९

वार्षिक सरासरीकुलाबा २ हजार २९२ मिमीसांताक्रूझ २ हजार ६६८ मिमी

टक्केवारीकुलाबा ९०.४१सांताक्रूझ ८४.४८

पाऊस मिमीमध्ये.कुलाबा ५३.२सांताक्रूझ ८४.३ठाणे ११०.६डाहणू ३८३.१वांद्रे ५१भाईंदर १७९दहिसर १७१मिरा रोड १८७राम मंदिर १०७पुणे ५८रत्नागिरी २१६.३महाबळेश्वर ३२०.९सिंधुर्ग १०७

टॅग्स :पाऊसमुंबईमानसून स्पेशलमुंबई मान्सून अपडेट