Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची झेन सदावर्ते, औरंगाबादचा आकाश खिल्लारे शूरवीर, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 07:40 IST

सहा श्रेणींमध्ये देण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनी मुंबईची झेन सदावर्ते व औरंगाबादचा आकाश खिल्लारे यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येईल. झेनने परळमधील तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून १७ जणांचे प्राण वाचविले होते, तर आकाशने नदीत बुडणाऱ्या आई-मुलीला वाचविले होते. देशातून २२ मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात १० मुली तर १२ मुलांचा समावेश आहे. एका बालकाला मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.झेन ही मुंबई हायकोर्टातील वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी आहे. २२ ऑगस्ट २०१८ रोजी परळ येथील क्रिस्टल टॉवर या १७ मजली इमारतीला आग लागली. यात चार जणांचा मृत्यू झाला. झेनच्या घरातही धूर पसरला. तेव्हा झेनने शेजारच्यांना धीर देत कमी धूर असलेल्या ठिकाणी नेले. अग्निशमन दलास बोलावले. अडकलेल्या १७ जणांना टॉवेल ओले करून; त्याचा विशिष्ट पद्धतीने मास्कप्रमाणे वापर करीत श्वास घेण्यास सांगितले. तर औरंगाबाद जिल्ह्यातील हातमाळी येथील आकाशने दुधना नदीत बुडत असलेल्या आई-मुलीचा जीव वाचविला. आकाशने नदीत उडी मारून प्रथम मुलीला आणि नंतर आईला सुखरूप बाहेर काढले.

सहा श्रेणींमध्ये देण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते, तसेच वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.मन की बात ही प्रत्येकाला अच्छी बात वाटते. पण ती सच्ची आहे की नाही ते पाहिले पाहिजे. मी ‘भूक की बात’ करीत आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील कुटुंबे ही शनिवारी, रविवारीही कामाला जात असतात. मी भुकेसाठी कुणाशीही लढेन. - झेन सदावर्ते

टॅग्स :आग