पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात युवसेनेची दिंडोशीत सायकल रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:06 IST2021-10-31T19:06:05+5:302021-10-31T19:06:54+5:30

दिंडोशी पेट्रोल पंप पासून शांताराम तलाव पर्यंत काढलेल्या या सायकल रॅलीत शेकडो युवासैनिक सहभागी झाले होते.

yuvasena cycle rally in Dindoshi against petrol and diesel price hike | पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात युवसेनेची दिंडोशीत सायकल रॅली

पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात युवसेनेची दिंडोशीत सायकल रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. याकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ युवासेना दिंडोशी विधानसभेतर्फे आज सायकल रॅली काढण्यात आली. दिंडोशी पेट्रोल पंप पासून शांताराम तलाव पर्यंत काढलेल्या या सायकल रॅलीत शेकडो युवासैनिक सहभागी झाले होते.

या सायकल रॅलीत युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनिल प्रभु, रुपेश कदम सहभागी झाले. यावेळी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी सहभागी होत महागाई विरोधात, पेट्रोल गेले शंभरी पार होष में आवो मोदी सरकार.... हेच का ते अच्छे दिन... मोदी सरकार हाय हाय.... घोषणांनी परिसर दणाणून सोडला व  केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
 

Web Title: yuvasena cycle rally in Dindoshi against petrol and diesel price hike