Join us

‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास दिव्यात मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 05:34 IST

रस्त्यामध्ये बंद पडलेली कार बाजूला घेण्यावरून झालेल्या वादावादीत मुंब्य्रातील वाहनचालकाला तिघांनी शनिवारी मध्यरात्री दिवा येथे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली.

मुंब्रा : रस्त्यामध्ये बंद पडलेली कार बाजूला घेण्यावरून झालेल्या वादावादीत मुंब्य्रातील वाहनचालकाला तिघांनी शनिवारी मध्यरात्री दिवा येथे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. फैजल खान असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून ‘जय श्रीराम’ न बोलल्याने मारहाण झाल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मंगेश मुढे, अनिल सूर्यवंशी व जयदीप मुढे यांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. मॉब लिचिंगची अफवा पसरल्याने मुंब्य्रात खळबळ उडाली होती.मुंब्य्रातील तन्वरनगर येथे राहणारा फैजल हा खाजगी वाहतूक कंपनीसाठी काम करतो. शनिवारी रात्री प्रवाशांना घेण्यासाठी तो दिव्यात गेला होता. तेव्हा त्याची कार रस्त्यात बंद पडली. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यात वादावादी होऊ न नशेत असलेल्या तिघांनी शेखला मारहाण केली. तेव्हा शेखने ‘अल्लाह के वास्ते छोड दो’ असे बोलताच तिघांनी त्याला ‘जय श्रीराम’ बोलण्यास सांगितल्याचे फैजलने तक्रारीत म्हटले आहे.मात्र, ही मॉब लिचिंगची घटना नसल्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :गुन्हेगारी