Join us

बीडच्या तरुणाची लोकलखाली उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:38 IST

वाशी स्थानकात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे.

नवी मुंबई : धावत्या लोकलखाली उडी मारून बीड येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना वाशी स्थानकात घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; तर दुसऱ्या घटनेत रूळ ओलांडणाऱ्याला रेल्वेची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

वाशी स्थानकात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या अमोल काळे (वय ३२) याने मुंबईकडे जाणाऱ्या लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तो मानखुर्दचा राहणारा असून मूळचा बीडचा आहे.  दुसऱ्या घटनेत दुपारच्या सुमारास घणसोली स्थानकालगत रूळ ओलांडणाऱ्या संतोष रोकडे (३१) यांना रेल्वेने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते घणसोलीतील रहिवासी होते.

टॅग्स :बीडलोकलनवी मुंबईमृत्यू