Join us
Daily Top 2Weekly Top 5

सी-लिंकवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; ओला चालवून करायचा उदरनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 09:27 IST

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता दादर पोलिस ठाण्यात हद्दीत मृतदेह मिळाला.

मुंबई : वरळी सी लिंकवरून उडी घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. शुक्रवारी त्याचा मृतदेह मिळाला. अल्ताफ मोहम्मद हुसेन (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून तो ओला चालक आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १ वाजता वरळी सी लिंकवरून एकाने उडी घेतल्याबाबत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल आला. एकजण कारने वरळी सी लिंकवर आला. त्यानंतर, गाडी उभी करून सी लिंक वरून समुद्रात उडी घेतली. वरळी पोलिस, अग्निशमन दलाच्या मदतीने शोध घेतला. मात्र, काळोख तसेच भरतीमुळे तरुणाचा शोध लागला नाही.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता दादर पोलिस ठाण्यात हद्दीत मृतदेह मिळाला. अल्ताफ गोवंडीत कुटुंबीयांसोबत राहायचा. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस