चेंबूर-वडाळा स्थानकांदरम्यान स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 06:32 IST2019-08-02T06:32:19+5:302019-08-02T06:32:41+5:30

या लोकलमधून कर्तव्यावर जात असलेले पोलीस सचिन पाटील आणि पोलीस सचिन मांडले

Youth arrested for stunting during Chembur-Wadala stations | चेंबूर-वडाळा स्थानकांदरम्यान स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना अटक

चेंबूर-वडाळा स्थानकांदरम्यान स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना अटक

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील चेंबूर-वडाळा स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाºया दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. मोहंमद मुश्तफा (१९) आणि समीर आबीद (२०) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघे गुरुवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास चेंबूर-वडाळा स्थानकांदरम्यान लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करीत होते.

या लोकलमधून कर्तव्यावर जात असलेले पोलीस सचिन पाटील आणि पोलीस सचिन मांडले यांनी या तरुणांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही उलट उत्तरे देऊन स्टंटबाजी करणे सुरू ठेवले. त्यामुळे पोलिसांनी माहितीसाठी स्टंटबाजी करणाऱ्यांचे चित्रीकरण केले.
वडाळा स्थानक आल्यावर दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.
 

Web Title: Youth arrested for stunting during Chembur-Wadala stations