Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपलीसुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे का?, राऊतांवरून मार्डच्या डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 05:05 IST

आपलीसुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे का, असा सवालही त्यांनी केला.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविरोधात केलेले विधान त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केली. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिला. आपलीसुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे का, असा सवालही त्यांनी केला.राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘डॉक्टरांना काय कळते, त्यांच्यापेक्षा कंपाउंडरला जास्त कळते,’ असे विधान करणे योग्य आहे का, असा सवाल मार्डने पत्रात केला. राऊत यांचे विधान कोरोनाकाळात डॉक्टरांचे मनोबल कमी करणारे असून तरुण डॉक्टरांचेही खच्चीकरण करणारे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांचे विमा कवचइस्लामपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने काम करणाºया खासगी डॉक्टरांना कोरोना होऊन मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :संजय राऊत