सी-लिंकवरुन तरुणाची समुद्रात उडी, पोलिसांकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:24 IST2023-09-21T16:23:33+5:302023-09-21T16:24:01+5:30
Mumbai Bandra Worli Sea Link News : मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक पुलावरुन एका तरुणाने समुद्रात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

सी-लिंकवरुन तरुणाची समुद्रात उडी, पोलिसांकडून शोध सुरू
Mumbai Bandra Worli Sea Link News : मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक पुलावरुन एका तरुणाने समुद्रात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित तरुण कारमधून सी लिंकवर आला आणि थेट समुद्रात उडी घेतली. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
गेल्या महिन्यात एका उद्योजकानं अशाच पद्धतीनं सी-लिंकवर कार थांबवून मग समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती. सी-लिंकवरुन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं यातून दिसून येत आहे. आज पहाटे ३.४५ च्या सुमारास एका तरुणानं सी-लिंकवर आपली कार एका बाजूला थांबवली. त्यातून तो उतरला आणि थेट समुद्रात उडी घेतली. सी-लिंकवरुन समुद्रात उडी मारणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. कारच्या नंबर प्लेटवरुन मालकाचा शोध घेतला जात आहे.