Join us

पोलीस चौकशीदरम्यान तरुणाचा मृत्यू; पाच पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 01:05 IST

वडाळ्यामध्ये दगडफेक, रास्तारोको, पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय

मुंबई : मुलीच्या छेडछाडीच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विजय सिंह (२६) या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना वडाळा टी टी पोलीस ठाण्यात घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्लाबोल केल्याने मंगळवारी वडाळा टी टी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाइकांच्या मागणीनंतर पोलिसांनी पाच पोलिसांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले. तर, सिंह याचा मृतदेह पुन्हा शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविला आहे.

सायन कोळीवाडा परिसरात सिंह हा कुटुंबीयांसोबत राहायचा. तो मेडिकल प्रतिनिधी म्हणून काम करायचा. त्याचा मित्र संजय सिंह याने दिलेल्या माहितीनुसार, सिंह याचा नुकताच साखरपुडा झाला. दोन महिन्यांनी त्याचे लग्न होते. नियोजित वधूशी बोलण्यासाठी तो वडाळा टी टी परिसरात जात होता.५ पोलीस निलंबितया प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक, संदिप कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम खान यांच्यासह पोलीस हवालदार भाबल, पोलीस नाईक चौरे आणि पोलीस शिपाई चोले या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी दिली.तुफान दगडफेकसोमवारपासूनच याविरुद्ध तीव्र पडसाद उमटत स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत चुनाभट्टी येथे सायन-पनवेल महामार्ग तर शिवडी चेंबूर मार्ग रोखला आहे. तसेच पोलिसांच्या गाडीवरदेखील दगडफेक करत आंदोलकांनी असंतोष व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. 

टॅग्स :पोलिस