प्रेयसीला गोळी मारत स्वतःवर गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:14 IST2021-01-08T04:14:31+5:302021-01-08T04:14:31+5:30

गोरेगावच्या बांगुरनगर परिसरातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: प्रेयसीवर गोळी झाडत तिची हत्या करुन नंतर स्वतःवरही गोळी झाडत एका ...

Young man commits suicide by shooting his girlfriend | प्रेयसीला गोळी मारत स्वतःवर गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

प्रेयसीला गोळी मारत स्वतःवर गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

गोरेगावच्या बांगुरनगर परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: प्रेयसीवर गोळी झाडत तिची हत्या करुन नंतर स्वतःवरही गोळी झाडत एका तरुणाने आत्महत्या केली. यात दोघांचाही मृत्यू झाला. गोरेगावच्या बांगुरनगर पोलिसांच्या हद्दीत सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गोरेगाव पश्चिम येथील इजमिमा इमारती जवळ इन्फिनिटी मॉलच्या मागे हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, राहुल असे तरुणाचे नाव असून त्याने त्याची प्रेयसी निधी हिच्या डोक्यात गोळी झाडत त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. निधी ही मालाड पूर्व परिसरात राहत असून राहुल कांदिवली पश्चिमचा राहणारा आहे. सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले असून प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Young man commits suicide by shooting his girlfriend