प्रेयसीची हत्या करत तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:14 IST2021-01-08T04:14:33+5:302021-01-08T04:14:33+5:30

गोरेगावच्या बांगुरनगर परिसरातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रेयसीवर गोळी झाडत तिची हत्या करून नंतर स्वतःवरही गोळी झाडून ...

Young man commits suicide by killing his girlfriend | प्रेयसीची हत्या करत तरुणाची आत्महत्या

प्रेयसीची हत्या करत तरुणाची आत्महत्या

गोरेगावच्या बांगुरनगर परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रेयसीवर गोळी झाडत तिची हत्या करून नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत एका तरुणाने आत्महत्या केली. गोरेगाव पश्चिम येथील इजमिमा इमारतीजवळ इन्फिनिटी मॉलच्या मागे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

राहुल यादव असे तरुणाचे नाव असून त्याने त्याची प्रेयसी निधी मिश्रा हिच्या डोक्यात गोळी झाडत त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली. घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळविले आणि दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. निधी हिचे राहुलवर प्रेम होते, मात्र जात वेगळी असल्याने दोघांच्याही घरच्यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे एकत्र राहू शकत नाही याची कल्पना दोघांना आली होती. त्यामुळे ते आयुष्य संपविण्याच्याच उद्देशाने बांगुरनगरमध्ये एकत्र आले होते. त्या वेळी हा प्रकार घडला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तर रात्री उशिरापर्यंत काही प्रत्यक्षदर्शींचा जबाब पोलीस नोंदवून घेत होते. निधी ही मालाड पूर्व परिसरात राहत होती, तर राहुल कांदिवली पश्चिमेला राहायचा.

Web Title: Young man commits suicide by killing his girlfriend