Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवतो; सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 07:14 IST

देवेंद्रजींनी तेथून बंदूक दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू, असे खासदार सुळे म्हणाल्या आहेत.

मुंबई : आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती बंदूक असलेली पोस्टर्स ठिकठिकाणी लावले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. देवेंद्रजींनी तेथून बंदूक दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू, असे खासदार सुळे म्हणाल्या आहेत.

गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक देऊन त्याची पोस्टरबाजी करणे हे माझ्यासारख्या एका महिलेसाठी धक्कादायक आहे. कारण, जी मुले तो बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. मिर्झापूर सिरीअलमध्ये या गोष्टी चालतात; पण वास्तवात नाही. हा छत्रपतींचा, शाहू- फुले-आंबडेकर यांचा महाराष्ट्र आहे. हा देश, हे राज्य बंदुकीने चालणार नाही, तर संविधानाने चालणार, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

टॅग्स :सुप्रिया सुळेदेवेंद्र फडणवीसबदलापूर