मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नव्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ केला. त्यानंतर पक्षाने या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक ‘टीझर’ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ‘तुम्ही एकटे नाही...’, ‘महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला असेच वाटते...’ आदी संदेश देण्यात आले आहेत.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा यंदाही मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार आहे. यावेळी मराठी अस्मिता, हिंदुत्व, स्थानिक प्रश्न आणि राज्यातील सध्याच्या राजकीय व सामाजिक घडामोडी हे मुद्दे केंद्रस्थानी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
‘हे तुम्हाला पटते का?’मनसेने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या ‘टीझर’मध्ये महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्रात जे चालले आहे ते पटत नाहीये का? रोजच्या घटनांमुळे मनस्ताप होत आहे का? महाराष्ट्राची ही अवस्था पाहून अस्वस्थ झाला आहात का?’ असे प्रश्न विचारत जनतेला साद घालण्यात आली आहे.
कोणता संदेश देणार?‘तुम्ही एकटे नाही...’, ‘महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला असेच वाटते...’ असा संदेशही मनसेने ‘टीझर’मध्ये दिला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे मनसैनिकांना काय संदेश देणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Web Summary : MNS prepares for Gudi Padwa rally at Shivaji Park, releasing a teaser focusing on Marathi identity, Hindutva, and current political issues. The teaser questions the public about the state of Maharashtra, assuring them they are not alone in their concerns.
Web Summary : मनसे शिवाजी पार्क में गुड़ी पड़वा रैली की तैयारी कर रही है, जिसमें मराठी पहचान, हिंदुत्व और वर्तमान राजनीतिक मुद्दों पर ध्यान केंद्रित किया गया है। टीज़र महाराष्ट्र की स्थिति के बारे में जनता से सवाल करता है, उन्हें आश्वस्त करता है कि वे अपनी चिंताओं में अकेले नहीं हैं।