Join us  

योगी आदित्यनाथ यांनी केले उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 8:25 PM

भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या दिवशी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती.

मुंबई/लखनौ - भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या दिवशी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौऱ्याचे स्वागत केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राउत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उद्धव  ठाकरे यांच्या अयोध्या भेटीचे स्वागत केले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

 

टॅग्स :योगी आदित्यनाथसंजय राऊतउद्धव ठाकरेशिवसेनाअयोध्या