By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 05:25 IST
विनोद तावडे : प्रत्येक तालुक्यामध्ये किमान ५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
राज्यातील २८८ तालुक्यांमध्ये साजरा करणार योग दिन
मुंबई : गेल्या चार वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी हा दिवस राज्यातील सर्व २८८ तालुक्यांमधील तालुका क्रीडा संकुलांमध्ये साजरा करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यामध्ये किमान ५ हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुरुवारी, सिडनहॅम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वर्षीचा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील २८८ तालुक्यांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. यात प्रत्येक तालुक्यातील किमान ५ हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/ एनसीसी/स्काऊट गाइड) मिळून जवळपास १५ लाख विद्यार्र्थी सहभागी होणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. राज्यातील योग शिकविणाऱ्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा होणार आहे. याशिवाय २१ जून रोजी नांदेड येथे रामदेवबाबा यांच्या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १.५० लाख नागरिक सहभागी होणार आहेत.ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उदाहरणार्थ मुंबई, कोकणकिंवा पुणे अशा ठिकाणी पाऊस पडल्यास विद्यार्थ्यांना योग कुठेकरता येईल, याबाबतही तयारी करण्यात येणार आहे.आयुष मंत्रालयामार्फत योगसाठी सकाळी ७ ते ८ ही वेळ देण्यातआली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आल्याचे तावडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीच्अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारकडून घेण्यात येईल. तसेच अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या प्रवेश प्रक्रियेला विलंब केला जाणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.च्अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांप्रमाणे सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे लेखी गुण ग्राह्य धरण्याबाबत राज्य सरकारच्या वतीने सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांशी चर्चा सुरू आहे. अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे गुण समान पातळीवर आणण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे, असेही तावडे यांनी सांगितले.अंतर्गत गुणांबाबत लवकरच बैठकीअंती कार्यवाहीशिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी अकरावीच्या प्रवेशासंदर्भात काही सूचना दिल्या असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत, प्रयत्न करण्यात येईल. महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या जागा वाढविण्यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि व्यवस्थापन यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात संबंधित महाविद्यालयाने अधिक जागांसाठी अनुकूलता दर्शविल्यास त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.