यंदाच्या पावसाळ्यात ४० ठिकाणी पाणी तुंबणार, पालिकेची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 02:02 IST2020-04-30T02:02:03+5:302020-04-30T02:02:10+5:30

तरीही ४० ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यातही पूरमुक्त होणार नाही, असे पालिका प्रशासनाने मान्य केले आहे.

This year, 40 places will be flooded, confesses the municipality | यंदाच्या पावसाळ्यात ४० ठिकाणी पाणी तुंबणार, पालिकेची कबुली

यंदाच्या पावसाळ्यात ४० ठिकाणी पाणी तुंबणार, पालिकेची कबुली

मुंबई  : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असते. हे चित्र बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यापैकी २२३ ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. तर २४ ठिकाणी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. तरीही ४० ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यातही पूरमुक्त होणार नाही, असे पालिका प्रशासनाने मान्य केले आहे.
मुंबईत अनेक भाग हे समुद्रसपाटीपासून खोलगट असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात भरती आल्यास पाणी साचण्याचे प्रकार घडतात. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुराच्या अनुभवानंतर महापालिकेने ब्रिमस्टोवेडअंतर्गत मुंबईत आठ ठिकाणी पंप बसविणे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवल्यामुळे पाणी साचणारी ठिकाणे कमी होत आहेत.
या प्रयत्नांमुळे मुंबईतील २२३ ठिकाणे पूरमुक्त झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. सन २०१७ मध्ये मुंबईत २२५ ठिकाणी पाणी साचले होते. २०१८ मध्ये ४८ आणि २०१९ मध्ये ६३ ठिकाणांची त्यात भर पडल्याने पाणी साचणारी ठिकाणे ३३६ झाली होती.
मात्र पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे २२३ ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत. तर आणखी २४ ठिकाणी सुरू असलेली काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू आहे. तसेच १४ ठिकाणी पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. तर २८ ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पालिका नियोजन करीत आहे.
 

Web Title: This year, 40 places will be flooded, confesses the municipality